कधी रडवून गेलेले, कधी हसवून गेलेले
पहा आठवत आहे मला, आज सारे विसरुन गेलेले.
पुन्हा मला तपासावे, मी आसतोच एकांती
मी कधी केलेच नाही, मला समजून गेलेले
कसे चुकले जरा माझे, मला शिकवून जा कोणी,
पहा, जिंकलेत ते सारे, माझे कनिष्ठ झालेले
पुन्हा ती भेटलीच नाही, जेव्हा वाट वेगळी का झाली
इरादे आहेत तिचे आता, सारे विसरुन गेलेले
दिलासे, धीर, उपकार नी माया, प्रेम, जिव्हाळ, सांत्वना नी काया
सा-या जगासोबत मलाही आज, फसवून गेलेले
कुणी लांबून ही होते मला फसवून गेलेले
ते आत्ममीय होते मला खपवून गेलेले.
आहेत असे ही काही, जे माझ्या श्वासात ही मोजता यावे,
असे बरेच काही आहे जे जवळून गेलेले
आहे कां वाट ऐशी प्रकाश छेदून जानारी,
एखादे नाव द्यावे, मन भूलऊन जाणारे
मला भेटायचे नाही असे ठरवून आलेले,
मला भेटून गेले, मला भेटून गेलेले
जरासे थांबून जावे कुणी माझ्या चितेपाशी,
मी आहेच ऐकटा असे हिनवून गेलेले
- prakash
Hindi Translation,JNU N Delhi - 67
Friday, May 29, 2009
Subscribe to:
Posts (Atom)