Monday, November 15, 2010
Friday, November 12, 2010
Thursday, November 4, 2010
चित्रपट- जोगवा गाणं - जीव रंगला गुंगला रंगला असा Jogavaa-jiva rangala gungala
जीव रंगला गुंगला रंगला असा,
प्रेमाची आस तू...,
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू...!
पैल तीरा नेशील, साथ मला देशील,
काळीज माझं तू...!
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं,
पुनवचा चांद तू...!
जीव रंगला गुंगला रंगला असा,
प्रेमाची आस तू...!,
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू...!
चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी,
रूझव्याची माती तू...!
खूळ आभाळ ढगाळ, त्याला रूढीचा विटाळ
माझ्या लाख सजना,
ही काकडाची तोड माळ तू...!
खूळं काळीज हे माझं तुला दिल मी आंदण,
तुज्या पायावर माखीन माझ्या जन्माचं गोंदण...
जीव रंगला गुंगला रंगला असा,
प्रेमाची आस तू...,
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू...!
पैल तीरा नेशील, साथ मला देशील,
काळीज माझं तू...!
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं,
पुनवचा चांद तू...!
जीव रंगला गुंगला रंगला असा,
प्रेमाची आस तू...,
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू...!
Wednesday, November 3, 2010
चित्रपट “नटरंग”- गाणं - खेळ मांडला (Khel Mandala)
तुझ्या पायरीशी कुनी सान थोर नाही,
साद सुन्या काळजाची तुज्या कानी जाई,
हे...तरी देवा सरना ह्यो भोग कश्या पायी,
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही,
ओवाळूनी उधरळतो जीव माय-बापा,
वण वायू ऊरी पेटला...खेळ मांडला २
खेळ मांडला...! २ खेळ मांडला...! २
सांडली गा रीत-भात घेतला वसा तुझा,
तुच वाट दाखवीगा खेळ मांडला,
दावी देवा पैल-पार पाठीशी तु रहा उभा
ह्यो तुझ्याच उंब-यात खेळ मांडला.
हे... उसावाला गनगोत सार,
आधार कुनाचा नाही,
ढगाळल्या भुई परी जिनं
अंगार जिवला जाळी
बळ दे झुंजायाला, किरप्याची ढाल दे,
इनवती पंच-प्राण, जिव्हारात ताल दे,
करपल रान देवा जळलं शिवार
तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला.!
Monday, October 25, 2010
जल जले तो अपने भी (Zalsale to apane bhI khuna ) मराठी फिल्म झेंडा
हाँ मैं हिंदूस्तान का वो युवा हूँ, जिसकी कोई खता नहीं, क्या खबर,
क्यों हुआ पैदा, क्यों मरेगा, पता नहीं, मौत तो यहाँ बड़ी सस्ती है..२
समंदर से आके मुफ्त में बटती है। मुझे भगत सिंह की मौत दो,
हजार बार मरुँगा.. हजार बार मरुँगा..कहाँ मिलती है.. पता नहीं..पता नहीं।
जल जले तो अपने भी खून में हैं,...२ और आँखों में हैं आँधी
पर जलाने को फिरंग है यहाँ और ना बुझाने को गांधी। २ जल-जले ऐ....
मंजीलों की मुझको तलाश है, पर पता नहींऽऽऽ किस तरफ बढूँ...होऽऽऽऽऽ।
हाथ में मेरे तो तलवार है, पर पता नहीं किससे लढू...होऽऽऽऽ।
अपने भी तो दिल में सरफरोशी, और आँखों में हैं आँधी
पर जलाने को फिरंग है यहाँ और ना बुझाने को गांधी।
जल जले तो अपने भी खून में हैं,...२ और आँखों में हैं आँधी
पर जलाने को फिरंग है यहाँ और ना बुझाने को गांधी। जल-जले ऐ....
रोज घर से एसे नीकलते हैं, जैसे जा रहे हो किसी युद्ध पर
हो..मेरे माँ की आँखों में भी बस एक डर, के मैं श्याम को आउ न आउ लौटकर
हो... मैंने भी तो युँ मेरी जींदगी हैं पैरों के तले रौंदी
पर जलाने को फिरंग है यहाँ और ना बुझाने को गांधी ।
जल जले तो अपने भी खून में हैं,...२ और आँखों में हैं आँधी
पर जलाने को फिरंग है यहाँ और ना बुझाने को........... गांधी।
Wednesday, October 20, 2010
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी व्हाऊ दे.. Airanicy deva tula thinagi-thinagi vhaau de..
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी व्हाऊ दे..
आभाळागत् माया तुझी आम्हावरी. ह्राऊ दे.. २
लेऊ लेन गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं...२
दिन होऊ अभरचं धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे..
आभाळागत् माया तुझी आम्हावरी. ह्राऊ दे..
लक्ष्मीच्या हातातली चोळी व्हावी वर-खाली..२
इडा-पीडा जाईल आदि किरपा तुझी भात्यातल्या पुडा संग. गाऊ दे...
आभाळागत् माया तुझी आम्हावरी. ह्राऊ दे..
सुख थोड दुख: भारी दुनया ही भली बुरी...२
घाव बसल घावा वरी सोसायाला झुंझायाला अंगी बळ ऐऊ दे..
आभाळागत् माया तुझी आम्हावरी. ह्राऊ दे..
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी व्हाऊ दे..
आभाळागत् माया तुझी आम्हावरी. ह्राऊ दे..
Tuesday, October 19, 2010
आकाशी झेप घे रे पाखरा... Akaashi zep ghe re paakhara- (Marathi film) Araam haaraam aahe
Akaashi zep ghe re paakhara- (Marathi film) Araam haaraam aahe
One of the My best song in Marathi-Prakash Kamble
आकाशी झेप घे रे पाखरा... २
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा..
तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया..२
सुख लो लुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा....
सोडी सोन्याचा पिंजरा...२
घर कसले ही तर कारा, विष समान मोती सारा..
मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवतो हा कैसा उंबरा
सोडी सोन्याचा पिंजरा... २
तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने..२ जा ओलांडून या सरीता सागरा...
सोडी सोन्याचा पिंजरा..२
कष्टा विन फळना मिळते..तुझ कळते परि ना वळते..२
ह्रदयात व्यथा ही जळते, का जिव बिचारा होई बावरा..
सोडी सोन्याचा पिंजरा..२
घामातून मोती फूलले श्रम देव जरी अवतरले...२
घर प्रसन्नतेने नटले..२ हा योग जीवनी आला काजवा
सोडी सोन्याचा पिंजरा..२
आकाशी झेप घे रे पाखरा..२
सोडी सोन्याचा पिंजरा...२
Saturday, October 9, 2010
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...(Vitthala Konataa Zenda gheu haati – film Zenda)
साचले मोहाचे धूके घनदाट हो....२
आपली माणंसं, आपलीचं नाती, तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...३
आज वर ज्यांची वाहीली पालखी भलताच त्यांचा देव होता...
भलताच त्यांचा देव होता...
पुरे झाली आली आता उगा माथे फोडी दगडात माझा जीव होता...
दगडात माझा जीव होता
उजळावा दीवा म्हणूनीया किती उग बिच्या-या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण जाणे, विठ्ठला..
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...३
बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं, उभ्या-उभ्या संपूण जाई..
उभ्या-उभ्या संपूण जाई..
खळ-रित रित मज बघूनि उमगलं कुंपण इथं शेत खाई...
कुंपण इथ शेत खाई..
भक्ताच्याच भाळी सारखीच माती तरी झेंडे येगळे, येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ति, सत्तेचीच प्रिती विठ्ठला..
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...३
Tuesday, September 21, 2010
पेड़ों के पत्ते
Monday, September 6, 2010
आठवण
आठवण
जसं खूप दिवसा पासून मन तरंग वरती काही नाही लिहलं तसंच खूप दिवसा पासून रात्री दहा वाजता झोपलो असेन आणि सकाळी सहा वाजता जागा झालो असेन असं जे.एन.यू मध्ये आल्या पासून कधी झालं असेल असं मला वाटन नाही. इथ असं का होतं हे मलाच नाही इथल्या प्रत्येक मुलांन पडलेला हा प्रश्न. आणि म्हणूनच आज सोलापूर ची खास आठवण झाली का तर मागी ब-याच दिवसा पासून आता रात्री तीन आणि चार वाजण्या अगोदर झोप येत नाही. सोलापूर मध्ये असताना असं कधी झालं असेल अस मला आठवत नाही. सोलापूरात असताना किती ही प्रयत्न केलं तरी रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या आत झोप येतं होती. आता तुम्ही म्हणाल यात आठवण करण्या सारख काय आहे मोठं परंतु झोप हरवले माणुसच असी अठवण करू शकतो. म्हणतात ना की ज्याच दु:ख तोच जाणू शकतो. आणि म्हणूणच रात्री तीन वाजू तीस मिनिट झाली असताना मी हा ब्लॉग लेख लिहित आहे.
या आठवणी बरोबर आणखीन ही काही सोलापूर आणि जे.एन.यू.च्या काही आठवणी चिटकवतो. काल म्हणजे ५-९-२०१० ला जे.एन.यू. मराठी फ्रेशर पार्टी झाली. सात हजार लोकांन मध्ये केवळ ३५ मराठी मुलं आणि मुली त्यात ही दोन तीन बाहेर चे होते. तरी त्यानां ही त्या मध्ये घेतलं तर ३५ झाले असं समजा. हे ३५ जनं कसे आले आणि का आले हे मला माहित नाही कारण या अगोदर ते दोन मराठी फ्रेशर पार्ट्या मी जवळुन पाहिल्या त्यांना निकाल ही माझ्या बरोबर आहे म्हणजे कागदो-पत्रि नाही मनाच्या उंबरठ्या वरती काही आठवणी कागद पत्रांची जी कामं करतात ना तसा कागदोपत्री निकाल आहे.
तर काल मराठी फ्रेशर झालं आणि काल मोठ्या-मोठ्या गोष्टी करणारे एक दुस-यांना पाहून रस्ता बदलून जाताना दिसले. का या प्रश्चाच उत्तर ज्या वर्षी आलो त्या वेळेस तर माहित नाही झालं परंतु आता थोडंस उमगत आहे. तस ही मराठी काल अलेल्यांन मधुन किती जनांना समजेल आणि किती जन हे वाचतील हे मला माहित नाही. पण मला म्हणायच इतकच आहे कि ज्या फ्रेशर पार्टी मुळं जवळीकता निर्माण होतं नसेल वर्षातून एकदा फक्त मराठी आहे म्हणून एकात्र येण्याच प्रयोजन होतं असेल आणि पुन्हा ओळखही पटत नसेल तर अश्या पार्ट्यांच सोंग कश्यासाठी करायचं ? कारण जे.एन.यु. मध्ये सोंगांची काही कमी नाही त्या साठी छात्र संगठना खूप मजबूत आहेत त्या साठी मराठी संस्कृति आणि मराठीचा बळी फुकटात का द्यायचा.
एका मित्रानं खूप उस्तुकतेन म्हणाला की हे आपलं कर्तव्या आहे की जे.एन.यू. मधल्या दूस-या राज्यातील मुलांना महाराट्राची संस्कृती काय आहे हे दाखवून देण. मला फक्त इतकच म्हणायच आहे की फक्त प्रशासन भवनाच्या पाय-यान वरती बसून भेळ खाल्यानं जे.एन.यू वाल्यांना मराठी संस्कृती माहित होईल. मराठी संस्कृती ची ओळख करून देन या वेळेस कुणाला जमनार नाही त्या साठी एक तप जाऊच द्या. फक्त एखाद दूस-याला ओळखलात तरी या पार्टीन खूप काही साधलं अस मला वाटेल पण कुटलं डोमल्याच असं होणारा आहे. मित्र एकदा झाले की कायमचे होत असतील तर त्याला महत्व असतं अस मला वाटत. घराकडचे मित्र कधी रस्ता बदलून जातात का ? विच्यार करण्या सारखी गोष्ट आहे.
आता तुम्ही म्हणालं या पार्टीत मला काही नाही भेटलच नसेल म्हाणून मी त्यांची आलोचना करत आहे. पण खरा भ्रष्टाचार म्हणजेच गफलच ही आहे की जे.एन.यू मधल्या मराठी विद्यार्थान मधे काही पॉब्लेम आहेत काय ते पण स्पष्ट करतो किमान येणा-या नवीन लोकांना तर कळेलं पाहिजे म्हणून आणि जाणा-याना समझाव म्हणून. पहिला प्रॉब्लेम तर एकमेकांनशी बोलण्याचा अभाव. माहिती असंती की कोण आहे, कुठला आहे, काय करतो पण कधी एक दूस-यांना बोलणार नाहीत अश्या लोकांना असं वाटतं की जे.एन.यू मध्ये मराठी बोलन तर माझी इज्जत कमी होईल किंवा लोक मला नावं ठेवतील. त्या मुळं वाटतं हे लोकं घरूनच शपथ घेऊन येतात की सर्व काही करेन पण एक मराठी बोलनार नाही. दूसरी गोष्ट सेंटर कोणत्या सेंटरचा आहे. त्या सेंटरचा अरे जाऊ दे काय बोलायचं त्याच्याशी बोलून काय फायदा म्हणजेच जे फायद्याच तिथच मराठी होण्याचा वापर. देव पण लाजेल अशी गोष्ट पण कोण काय करू शकतो.
तिसरी गोष्ट म्हणजे कोठून आहे ? म्हणजे महाराष्ट्रात जे.एन.यू.चे तीन केद्र आहेत एक नागपूर, पुणे आणि मुंबई ठीक जर पुण्याचा असेलं तर ठीक आणि मुंबई चा असेल तर आणखीण “तुपात सोनं” म्हणजे खूपच छान. पण नागपूरचा असेल तर बोलण्याच्या अगोदर एक वेळा विचार करावा लागेल कारण नागपूर आणि पुणे मुंबई खूप मोठं अंतर खूप मोठं महणजे किती तर चारशे ते चारशे पन्नास इतक अर्थातच त्यामुळं त्यांना बोलण्याचा नंतर काही काही उपयोग होणार नाही हे नक्की झालं. आणि जर मराठवड्यातला असेल तर त्यांना काय विचारायचच नाही कारण मराठी कोणत्या बाजूला पडतो हेच नक्की माहित नाही आणखीन विदर्भात शेतकरी आत्महत्या केले म्हणून आणि नागपूर मुळं विदर्भ माहित तर आहे बाकी लोकांची तर मोठी पंचाईत आहे.
पुढचा मुद्दा मुळाचा म्हणजेच महत्वाचा नाव, जात आणि कुळ विचारण्याची गरजच नसते बोलण्यावरून सर्व काही माहित होतं आणि त्या वरूनच ठरवायच असतं की समोरच्याशी बोलायच की नाही. चुकीच काहीच नाही पण खरं जे आहे ते तर लिहावंच लागेल.
नंतरचा मुद्दा आहे छात्र संगठन. गेल्या वेळेस मराठी फ्रेशर नाही झालं का तर त्याला एक कारण हे ही होतं. आता या गोष्टीला मानायला कोणी तयार असेलं नसेल त्याचं मला काही घेण देणं नाही पण आमुक एका पार्टीचा मुलगा-मुलगी जास्त पुढं-पुढं करत होती तर तीच करेल किंवा आम्ही ती का पुढं येऊ द्यायचं. अश्या काही नाटकांन मुळंच गेल्यावेळेस मराठी फ्रेशर झालं नाही.
सर्वात महत्वाचा मुद्दा क्लास भाषे वरून जात समजते, राहण्या वरून माणसाची आर्थिक परस्थितिची, आणि चालण्या वरून, दिसण्या वरून आणि गुणांण गरून ज्ञान समजते तर या मधला राहण्याचा मुद्दा थोडा जास्त महत्वाचा आहे. कसा राहतो आणि कसा बोलतो या वरून एक मराठी मुलगा-मुलगी दुस-यासी बोलायचं की नाही हे ठरवतो. जसं महाराष्ट्रात होतं नेमकं तसचं. आर्थीक परस्थिति त्याची दूसरी बाजू कारण ती कमजोर असेल तर त्याचा क्लास नक्कीच खालच्या लेवलचा असणार. क्लास खालच्या लेवलचा असेल तर ज्ञान कमी असणार तर का बोलायचं.
त्याच्या पुढची आणखीन एक बाजू मुलगा-मुलगी तो मुलगा आहे त्याच्याशी कस बोलू, ती मुलगी आगे तिच्याशी कसं बोलू झालं बोलनं आपो-आप बोलणं बंद झालं समजा. नाही तरी किमान मुलांचा आणि मुलींचा एक एक वेगळा तरी ग्रूप असेल असं तुम्हाला चुकुन वाटेल असं ही काही नाही. नाही तेच बरं आहे.
मी काही अश्याही लोकांना ओळखतो जे केवळ एका विशिष्ट जातिच वर्चस्व असल्याच्या कल्पने मुळं किंवा ते वरचढ होती या मुळं मराठी फ्रेशर पार्टी मधे येत नाहीत आणि मराठी मुलांशी बोलत नाहीत. परंतु त्यांना माझं एकच म्हणणं आहे की जे.एन.यु. मध्ये केवळ महाराष्ट्रातील मुलं राहतात असं नाही केरळ,पंजाब,हरयाणा,तमिळनाडु, ओडिसा, राजस्थान, कश्मीर, हिमाचल, बिहार, यु.पी. प.बंगाल आणि देश्यातीलच नाही परदेश्यातील लोक ही आहेत आणि ते आपाअपल्या पद्धतीने त्यांच्या जाति पातिच्या राजकारणापासून दूर होऊन त्यांच्या राज्याचं प्रतिनिधित्व करतान आणि जर वर्षी साकृतिक कार्यक्रम ही करतात. तर काही गोष्टींना दूर ठेऊन सर्वांनी एकत्र यायचा काही हरकत नाही अस मला वाटतं. जर वर्चस्वाच्या राजकारणाचा खेळ महाराष्ट्राची संकृति असेल तर वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची गरज नाही असं मला वाटतं.
अनर्थक आणि कळीचा मुद्दा काय तर कोण किती इंग्रजाळलेला आहे त्या वरून एक जे.एन.यु.विद्यार्थी मराठी
दूस-याशी बोलतो या गोष्टीचं प्रमाण ही तसं जास्त आहे पण आणि त्या कारण ही तसंच आहे एक जन स्वताला दूस-याला जास्त इंग्रजाळलेला समजतो आणि न बोलण्याची दरी रूंदावत जाते. आगोदर सात हजार लोकांत पन्नास मराठी आणि त्यात ही इतके प्रॉब्लेम कसं महाराष्ट्राचा सांकृक्तिक कार्यक्रम करणार आणि कधी करणार याची स्वप्नात ही कल्पना करण आता कठीन आहे. परंतु दुस-या राज्यातील लोकांचे कार्यक्रम पाहून वाटतंच की आपलं असं ही काही व्हावं. काय मी पण खूप दिवसांनी ब्लॉग लिहण्याचा विचार केला अनं मराठी फ्रेशर आणि जे.एन.यु तील मराठी जमात नावाचा जे.एन.यु.चा पर्चाच लिहला. जर कोणाला या गोष्टीच दुख: झालं असेल तर माफ करा. पण “जे.एन.यु. मधील मराठी मुलांच्या फुटाफुटीच्या राजकारणाचा बाप कोण आहे ?” असा प्रश्न जर कोणी केलाच तर त्याला उत्तर तर द्यावच लागेल ना. ठीक आहे रात्री चे पाच वाजत आहे. झोपायच ही आहे. इंटरनेट रूम वरती नाही उद्या केंद्रीय पुस्तकालयात जाऊन पोस्ट कराव लागेल.



















