Tuesday, June 30, 2009

शांता शेळकेची एक कविता.

असा उतारा जहराचा किति वेलांट्या
किति वळसेकितीक गुंते वाटांचे,
अनोळखी पण फिटले नाही
परंतु सागर लाटांचे

भरगर्दीतही मला वाटले
आहे निर्जत वनामधी
असेल चुकले हे कदाचित
मनेच फिरले जनामधी अता मला भरवसाच
नाहीउरलेल्या या शहराचा
बहरावरती मिळे अचानक
उस उतारा जहराचा.
- शांता शेळके

अटळ
शेवटी अटळ असते
गाठी तुटत जाणे
संबंध सुटत जाणे

शेवटी अटळ असते
रंग विटत जाणे
क्षितिज मिटत जाणे.
- अटळ

Friday, May 29, 2009

एक मरठी कविता(one Marathi poem)

कधी रडवून गेलेले, कधी हसवून गेलेले
पहा आठवत आहे मला, आज सारे विसरुन गेलेले.

पुन्हा मला तपासावे, मी आसतोच एकांती
मी कधी केलेच नाही, मला समजून गेलेले

कसे चुकले जरा माझे, मला शिकवून जा कोणी,
पहा, जिंकलेत ते सारे, माझे कनिष्ठ झालेले

पुन्हा ती भेटलीच नाही, जेव्हा वाट वेगळी का झाली
इरादे आहेत तिचे आता, सारे विसरुन गेलेले

दिलासे, धीर, उपकार नी माया, प्रेम, जिव्हाळ, सांत्वना नी काया
सा-या जगासोबत मलाही आज, फसवून गेलेले

कुणी लांबून ही होते मला फसवून गेलेले
ते आत्ममीय होते मला खपवून गेलेले.

आहेत असे ही काही, जे माझ्या श्वासात ही मोजता यावे,
असे बरेच काही आहे जे जवळून गेलेले

आहे कां वाट ऐशी प्रकाश छेदून जानारी,
एखादे नाव द्यावे, मन भूलऊन जाणारे

मला भेटायचे नाही असे ठरवून आलेले,
मला भेटून गेले, मला भेटून गेलेले

जरासे थांबून जावे कुणी माझ्या चितेपाशी,
मी आहेच ऐकटा असे हिनवून गेलेले
- prakash
Hindi Translation,JNU N Delhi - 67

Friday, February 13, 2009

भ्रष्टाचाराच्या सापळ्यात सापडलेलं सोलापूर

भ्रष्टाचाराच्या सापळ्यात सापडलेलं सोलापूर

मित्रांनो सर्वांच्या मस्तिष्कात आज ही गिरण्या तितक्याच स्पष्ट आवाजात घोंगावत असतील जीतक्या १९८०- ८६ सालत घोंघावत होत्या. शब्द तसा फार अवघड आहे. परंतू मित्रांनो हा शब्द तसा जूनाच आहे. कारण एक तर गिरणी ओरडायची किंवा घोंघावायची बंद पडायची तिला सवयच नव्हती असे अमचे वाड-वडिल सांगायचे. आज स्थिति अशी आहे की घोंगावणे शब्द ही सोलापूरात बंद पडला. असो पण चूकून नजरा जाम मिल, लक्ष्मी-विष्णू मिल आणि सोलापूरात उभ्या परंतू न घोंगावणा-या गिरण्यांना पाहिल्यावर आपो आप आठवतो नातच अस जमल होतं त्या गिरण्यांशी अमच. रात्री १०.३० ला झोपण्याचा मग सकाळी अभ्यास करायचा असेल तर ५.३० चा अभ्यास करायचा नसेल तर ७.०० चा शाळेला जाण्या साठी ११.०० चा शाळा नसली तर विक्रम-वेताळ पाहण्यासाठी असो किंवा रविवारी मराठी चित्रपट पाहण्यासाठी ४.०० चा घोंघावणा-या गिरण्या आज ही आठवतात.
नक्की काय घडल ते आजून ही काही कळायला मार्ग नाही. गिरण्या का बंद पडल्या बंद पडल्या तर त्या २० वर्षा नंतरही का चालू झाल्या नाहीत. यावरती विचार करायला कोणाकडे वेळ नाही किंवा सोलापूर करांनकड काम खूप आहेत. गिरणि बंद पडली काय आणि चालू झाली काय याची काळजी नाही अस ही नाही. शेवटी “घोडं कुठ पेंड खात आहे” कळायताच मार्ग नाही. एक देशाची आयटी कंपनी भ्रटाचार करते आणि तिला दोन-दोन हजार करोड रुपयाचा मलिदा देउन पुन्हा जगवण्याच येतं कारण या कंपनीत ५३ हजार लोक काम करतात. पण सोलापूरच्या मिलांन मध्ये लाख दिड लाख लोक काम करत होते. यातल्या काही गिरण्या देशात नाही तर संपूर्ण आशिया खंडात अग्रणी होत्या. मग असं काय कारण होतं की या गिरण्यांना अर्थशास्त्रज्ञांना एक छोटासा दोन थेंबाचा ढोस ही देन गरजेच वाटलं नाही किंवा वाटत नाही. कारणं लाख आहेत आमच्या नगराचे नेते बंद गिरण्याचे ओझे वाहू शकले नाहीत आणि आजही ते वाहू शकत नाहीत पहिलं आणि स्पष्ट कारण. सोलापूरात जो मोठा नेता झाला त्याचा प्रतिस्पर्धी ही त्याहून अधिक मजबूत आणि वरचढ असाच मिळाला. सत्ता कोणाची ही असो आमचा प्रश्च काही सूटला नाही नाही महानगर पालिका संभाळणा-यांनी कधी अपल्या देवाला गिरण्या पुन्हा सुरुकरण्या साठी पुजा केली ना त्याना कधी साकडं घातलं. उलट कर वाढवून नाकी नऊ आनण्यात मात्र हाथभार जरुर लावला. मूळात म्हणाचंच काय तर गिरणि चालू करण्याच्या नावावर सोलापूरला एक धाकड नेताच मिळाला नाही. हां असे अनेक नेते असे जरुर आहेत की जे स्वता:ची गिरणिच काय गिरण्या कारखाने अणि काय-काय उभा करतीय याचा अंदाज ही घेता येणार नाही.
या नेत्यांच्या पुढं जाऊन पाहिल तर एका मालकातून निर्माण झालेले अनेक मालकं हे दूसर कारण. जेवढं माझ्या लक्षात आहे आणि मागिल समाचार पत्रात वाचून मिळेल ते असं की मोठ्या गिरण्या जेव्हा चालू होत्या त्या वेळेस सोलापूरात फार कमी प्रमाणात किरकोळ कारखाने चालत असत परंतू जेव्हा एक गिरणि बंद पडली अणि गिरणि बंद पडण्याचा सपाटा सूरु झाला अन पाहता-पाहता सोलापूराच्या गल्ली-बोळात कारखान्यांची स्थापना कुत्र्याच्या छत्री प्रमाण वाढली. महिन्यातून एकदा मिळणा-या पगारी पेक्षा महिन्यातून चारदा मिळणारी पगार अन भूकेल्या पोटाला भाकरीच्या तुकड्याचा आधार घेण्यासाठी सोलापूरक आपली दोन चाकी सायकल या कारखान्यांच्या समोर लावू लागले. या कामगारांना नंतर कधी गिरणि चालू होण्याचा मोह बळावला नाही. कामगार संघटनांचे कित्येक नेते ही कारखान्यात जाऊन काम करु लागले. काही अति शहाने लोक अस्याही गप्पा हाकता की गिरणि चालू असताना कित्येक कामगार पत्ये खेळत, दारु पिऊन कामावरती येत किंवा हजेरी लावून ही काम करत नसत. हे कोड तितकच अवघड आहे जितक एकाखाद्या अति शहाण्याला विचारण्यात आव की “अंड आधि की कोंबड”. जर कामगार काम करत नव्हते तर जिल्हा परिषद, इंद्रभवन, चार थेटर सोलापूरच्या चौका-चौका चहाच्या, झेरॉक्सच्या, पानच्या, मटक्याच्या, किराणाच्या टप-यांन वर मिलांच्या नावांन सकट पूर्ण पत्ता लिहून कामगार काम नकरताच आपला संसार कसा काय चालवत असत हे समजन आणखिन अवघड काम. असो नारळ फोडायचाच तर कूनाच तर डोकं फूटनारच नाही का अन कामगारा पेक्षा अधिक मजबूत डोकं कुनाच असणार नाही का.
लिहायचं म्हंटल तर काही ही आणि किती ही लिहता येतं. तसं एख्याद्या शोध पत्रा प्रमाण शोध घेऊन एखादा “सोलापूर आणि बंद गिरण्यांन मागची कारस्थान” नावाचा लेख लिहला तर एखाद्या आतंकवादी हामल्याचा आरोपी पकडावा तसा एकेकाला संपूर्ण सोलापूर करांन समोर उभ करता येईल पण करणार काय गिरण्यांचा भोंगा इतका शांत झाला आहे की तो पुन्हा वाजन म्हणजे एखाद्याचा पूर्नजन्म समजावं. अशी कित्येक चित्रपट आहेत ही आणि होऊ ही शकत पण प्रत्यक्षात एक ही उदाहरण मिळत नाही. असो तर मी ही आता मोठा झालो आहे अणि शाळेला जाण्याचा प्रश्न ही उद्भवत नाही. ४०० रुपयांच सनाटाचं घड्याळ हातात आहे एक मोबाईल आहे सकाळी लवकर उठायचं झालंच तर आलार्म लावलो. प्रश्न आहे तो सोलापूरच्या शिक्षित बेरोजगारांचा आणि भविष्यात निर्माण होणा-या आमच्या नेत्यांचा की ते की अधिकाधिक कारखाने सोलापूरात उभा करतात आणि बेरोजगारांना काम देतात. बाकी सर्व ठीक आहे प्रतिक्रिया मजेत आहे. २००९ च्या मतदानात यात्रेत अश्याच
गिरणिच्या गप्पा आपण ही मारुत आणि आपले सूज्ञ नेते ही मारत राहतील आणि जिंकतील ही. पुन्हा भेटूया नमस्कार.

Prakash A Kamble
Hindi Translation
JNU, N Delhai - 67

मराठी पुस्तकांना भरभराटी चे दिवस आले.

प्रिय मित्रांनो,
काही दिवसांन पुर्वी लोकसत्ता मध्ये इस न्यूज होती की मराठी पुस्तकांना भरभराटी चे दिवस आले. कसे आले याची ग्वाही देण्या करिता काही पुस्तकाची नावं ही देण्यात आली होती. ज्या मध्ये मी आणि आमचा बाप नावाच ही एक पुस्तक होतं. या पुस्तकाचं नाव लक्ष्यात असण्याच एकच कारण आहे ते म्हण्जे मी सोलापुर मध्ये असताना हे पुस्तक विकत घेतलं आहे. फक्त ६० रुपयात।– या ६० रुपयाची विषेशता ही आहे की हे पुस्तक कोणत्याही प्रकारचा डिस्कांट न घेता विकत घेतलं आहे. तसं पाहिल तर मराठी पुस्तक ६० रुपयात विकत घेणं किंवा ते मिळणं. ही तसी तर मोठी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रात एक म्हण १९६० ते २००० किंवा आज ही मोठ्या थाटात बोलली जाते ती म्हणजे “महाराष्ट्रात महारांनी पुस्तकं औणि बामणांनी मटन महाग केलं” म्हण तशी तर खोटी आहे परंतू प्रश्न हा आह की ही म्हण तयार कोणी केली. अर्थ तसा गर्भीत आहे पण एमबीए च्या विद्यार्थी याची पोल खोलण्यात जास्त वेळ घेणार नाही। तो स्पष्ट शब्दात सागेल की हे काम एक तर कसायाच असाव नाही तर प्रकाशकाच। चला या वाक्यानं काही तरी अर्थ स्पष्ट झाला असावा. राहीला सवाल डिस्काउंट न घेता ६० रुपयांत पुस्तक विकत घेण्याचा. ६० रुपयात पुस्तक विकत देऊन नाही प्रकाशकाने माझ्यावरती उपकार केलं आहे नाही ६० रुपयात पुस्तक विकत घेऊन मी प्रकाशकावर उपकार केलं आहे. कारण पुस्तक “हार्ड बॉण्ड” नव्हत पुस्तक होतं “पेपर बैंक” जे महाराष्ट्रात बोहतेक नवीन असाव किंवा ही कल्पना प्रकाशकांना आत्ता नवीन माहित झाली असावी. असो दुसरं पुस्तक मी विकत घेतलं ते जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयात के.सी.मार्केट मध्ये ३० रुपयात पुस्तकाचं नाव आहे “भुल चुक लेनी देनी”. तेही पेपर बैंक आणि त्याहुन मजेची बाब असी की त्यात ही मला डिस्काउंट मिळालं. त्यामुळ त्याची किंमत झाली २६ रुपये. म्हणजे जर मी मराठी पुस्तक दिल्लीत विकत घेतलं असत तर ते मला किमान ५२ रुपयात मिळालं असतं परंतु नशिब माझं की मराठी पुस्तक दिल्लीत कस मिळणार.
डिस्काउंटच्या संबंधात एमबीए विद्यार्थी डोकं लावेल की जर तुम्ही एक हिंदी पुस्तक २६ रुपयांत दिल्लीत विकत घेतलात व ते पुस्तक तुम्ही महाराष्ट्रात रेल्वे, ट्रक, मालगाडी, विमान, हेलिकॉप्टर किंवा अन्य वाहतूकी ने घेऊन आलात तर ते पुस्तक तुम्हाला ३० हून अधिक किमतीत मिळेल. हे स्टॅटिस्टिक तर खूप सरळ आहे परंतू मित्रांनों जर जर हिंदी प्रदेशात हिंदी पुस्तकांना १०, १५, २०, ३०, ४०, ५० आणि काही विषेष पुस्तकांना ६० परसेंट डिस्काउंट पर्यंत डिस्काउंट मिळत असेल तर मराठी पुस्तकांन सोबत हे का घडत नाही.
काही दिवसांन पूर्वी मराठी पुस्तक विकत घेण्या करिता बाजारात गेलो तर अश्या अनेक मराठी पुस्तकांच्या प्रति पहायला मिळाल्या ज्या सामान्य पाठकांन पर्यंत कधी पोहचल्यात नाहीत. जर सर्व प्रकाशक अश्या प्रतिंच्या “पेपर बैंक” काढून त्या सामान्य पाठकांन पर्यंत पोहचवण्याचे काम करतील तर हे काम केवळ मराठी भाषेच्याच नाही तर प्रकाशकांच्या दृष्टिनेही फायद्याचे ठरे.
जर हिंदी प्रकाशक सामान्य हिंदी साहित्यिक मासिकांन वरती डिस्काउंट वरती देउ शकतात तर मराठी पत्रिकांन सोबत हे का होऊ शकत नाही. हे सर्व लिहण्याच एकच कारण की केवळ मराठीत उत्कृष्ठ लिहूनच चालणार नाही लिहलेलं अनेकांन पर्यंत अनेकात ही सामान्यांतून सामान्यांन पर्यंत पोहचन जरुरी आहे. मग महाराष्ट्राती किती ही जाति किती ही धर्म पुस्तक वाचण्याच्या रांगेत बकोत पुस्तकं महाग होणार नाहीत. मुल्यवान अवश्य होतील।

Prakash A Kamble
Hindi Translation
JNU, Delhi - 67


चार ओळी
एक नाही
किती व्यथा माझ्या
किती सांगू किती कथा
माझ्या.
- पंकज
तू आणि मी एकटेच असावे
किंवा
तू एकटी असावीस
किंवा
मी
- पंकज