प्रिय मित्रांनो,
काही दिवसांन पुर्वी लोकसत्ता मध्ये इस न्यूज होती की मराठी पुस्तकांना भरभराटी चे दिवस आले. कसे आले याची ग्वाही देण्या करिता काही पुस्तकाची नावं ही देण्यात आली होती. ज्या मध्ये मी आणि आमचा बाप नावाच ही एक पुस्तक होतं. या पुस्तकाचं नाव लक्ष्यात असण्याच एकच कारण आहे ते म्हण्जे मी सोलापुर मध्ये असताना हे पुस्तक विकत घेतलं आहे. फक्त ६० रुपयात।– या ६० रुपयाची विषेशता ही आहे की हे पुस्तक कोणत्याही प्रकारचा डिस्कांट न घेता विकत घेतलं आहे. तसं पाहिल तर मराठी पुस्तक ६० रुपयात विकत घेणं किंवा ते मिळणं. ही तसी तर मोठी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रात एक म्हण १९६० ते २००० किंवा आज ही मोठ्या थाटात बोलली जाते ती म्हणजे “महाराष्ट्रात महारांनी पुस्तकं औणि बामणांनी मटन महाग केलं” म्हण तशी तर खोटी आहे परंतू प्रश्न हा आह की ही म्हण तयार कोणी केली. अर्थ तसा गर्भीत आहे पण एमबीए च्या विद्यार्थी याची पोल खोलण्यात जास्त वेळ घेणार नाही। तो स्पष्ट शब्दात सागेल की हे काम एक तर कसायाच असाव नाही तर प्रकाशकाच। चला या वाक्यानं काही तरी अर्थ स्पष्ट झाला असावा. राहीला सवाल डिस्काउंट न घेता ६० रुपयांत पुस्तक विकत घेण्याचा. ६० रुपयात पुस्तक विकत देऊन नाही प्रकाशकाने माझ्यावरती उपकार केलं आहे नाही ६० रुपयात पुस्तक विकत घेऊन मी प्रकाशकावर उपकार केलं आहे. कारण पुस्तक “हार्ड बॉण्ड” नव्हत पुस्तक होतं “पेपर बैंक” जे महाराष्ट्रात बोहतेक नवीन असाव किंवा ही कल्पना प्रकाशकांना आत्ता नवीन माहित झाली असावी. असो दुसरं पुस्तक मी विकत घेतलं ते जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयात के.सी.मार्केट मध्ये ३० रुपयात पुस्तकाचं नाव आहे “भुल चुक लेनी देनी”. तेही पेपर बैंक आणि त्याहुन मजेची बाब असी की त्यात ही मला डिस्काउंट मिळालं. त्यामुळ त्याची किंमत झाली २६ रुपये. म्हणजे जर मी मराठी पुस्तक दिल्लीत विकत घेतलं असत तर ते मला किमान ५२ रुपयात मिळालं असतं परंतु नशिब माझं की मराठी पुस्तक दिल्लीत कस मिळणार.
डिस्काउंटच्या संबंधात एमबीए विद्यार्थी डोकं लावेल की जर तुम्ही एक हिंदी पुस्तक २६ रुपयांत दिल्लीत विकत घेतलात व ते पुस्तक तुम्ही महाराष्ट्रात रेल्वे, ट्रक, मालगाडी, विमान, हेलिकॉप्टर किंवा अन्य वाहतूकी ने घेऊन आलात तर ते पुस्तक तुम्हाला ३० हून अधिक किमतीत मिळेल. हे स्टॅटिस्टिक तर खूप सरळ आहे परंतू मित्रांनों जर जर हिंदी प्रदेशात हिंदी पुस्तकांना १०, १५, २०, ३०, ४०, ५० आणि काही विषेष पुस्तकांना ६० परसेंट डिस्काउंट पर्यंत डिस्काउंट मिळत असेल तर मराठी पुस्तकांन सोबत हे का घडत नाही.
काही दिवसांन पूर्वी मराठी पुस्तक विकत घेण्या करिता बाजारात गेलो तर अश्या अनेक मराठी पुस्तकांच्या प्रति पहायला मिळाल्या ज्या सामान्य पाठकांन पर्यंत कधी पोहचल्यात नाहीत. जर सर्व प्रकाशक अश्या प्रतिंच्या “पेपर बैंक” काढून त्या सामान्य पाठकांन पर्यंत पोहचवण्याचे काम करतील तर हे काम केवळ मराठी भाषेच्याच नाही तर प्रकाशकांच्या दृष्टिनेही फायद्याचे ठरे.
जर हिंदी प्रकाशक सामान्य हिंदी साहित्यिक मासिकांन वरती डिस्काउंट वरती देउ शकतात तर मराठी पत्रिकांन सोबत हे का होऊ शकत नाही. हे सर्व लिहण्याच एकच कारण की केवळ मराठीत उत्कृष्ठ लिहूनच चालणार नाही लिहलेलं अनेकांन पर्यंत अनेकात ही सामान्यांतून सामान्यांन पर्यंत पोहचन जरुरी आहे. मग महाराष्ट्राती किती ही जाति किती ही धर्म पुस्तक वाचण्याच्या रांगेत बकोत पुस्तकं महाग होणार नाहीत. मुल्यवान अवश्य होतील।
Prakash A Kamble
Hindi Translation
JNU, Delhi - 67
चार ओळी
एक नाही
किती व्यथा माझ्या
किती सांगू किती कथा
माझ्या.
- पंकज
तू आणि मी एकटेच असावे
किंवा
तू एकटी असावीस
किंवा
मी
- पंकज
Friday, February 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment