Monday, November 24, 2008

मन तरंग माझा मराठी ब्लॉग

आज मन तरंग वरती सर्व मनातील सर्व काही मांडण्याची सूरवात करावीशी वाटत आहे. केवळ या करिता की ज्या भावनिकतेत मी आजवर जगत आलो त्या गोष्टिंना त्या बाबींना व्यावहारीक पक्षांनी इतक्या बोचक्या स्वरुपात ओरबडण्याची कल्पनाही मी करु शकत नव्हतो. छे पुन्हा त्याच गोष्टि मनावरती धावा घेत आहेत. असो पण आज निर्धार केला म्हणजे केला. आणि माझा निर्धार हा केवळ माझाच असतो हे माझ्या जाकारांना माहीतच आहे. ही तर झाली आजची बाजू. मन तरंग लिहण्याचा केवळ एकच उद्देश्य दिवसभर मेंदूवर पडना-या हिंदी तत्वज्ञानाचा मेंदूला झालेला त्रास व त्याची व त्याची ओसरत चाललेली मराठीची सवय आबादीत राखन्यासाठी मनाचा एक कोपरा रिकामा करण्याची मनाशीच लावलेली एक पैज पूर्ण करण्याची एक खटाटोप.
परंतू यात मन तरंग मध्ये त्या भावनिक व काल्पनिक गोष्टिंना आधार नसेल याची कळजी आवश्य घेईन. आज जे काही पाहिल तेच ब्लूलाई चा प्रवास आणि ग्रंथालयाची आवक जावक प्रक्रिया यातून मोकळ होऊन काही तरी वेगळ करण्याचा मनाचा चंग आज जास्तच बळावला.





















मन तरंग हा माझा पहिला मराठी ब्लॉग. माझा एक ब्लॉग हिंदी चा आहे. ज्याचे नाव Machine Translation आहे. या ब्लॉग बद्दल काही लिहिण्याची गरज नाही. हा माझा नवीन ब्लाग खास करुण माझ्या मनातील व विचारांना रंगवणार आहे. एक ब्लॉग माझ्या शौक्षणिक कार्यासाठी तयार केला. आता वेळ आली ती मनातील गोष्टिंना उजाळा देण्याची आणि आज. त्या स्वपनांना साकार करण्या साठी हा माझा नवीन ब्लॉग सर्वान समोर सादर आहे. हां आहे तर सर्वांन समोर परंतू सर्वांन शी बोलण्याचा किंवा संपर्काचे हे स्थळ मूळीच नाही याची काळजी सर्वांना असावी.

No comments: