Saturday, October 9, 2010

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...(Vitthala Konataa Zenda gheu haati – film Zenda)

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो...
साचले मोहाचे धूके घनदाट हो....२
आपली माणंसं, आपलीचं नाती, तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...३
आज वर ज्यांची वाहीली पालखी भलताच त्यांचा देव होता...
भलताच त्यांचा देव होता...
पुरे झाली आली आता उगा माथे फोडी दगडात माझा जीव होता...
दगडात माझा जीव होता
उजळावा दीवा म्हणूनीया किती उग बिच्या-या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण जाणे, विठ्ठला..
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...३
बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं, उभ्या-उभ्या संपूण जाई..
उभ्या-उभ्या संपूण जाई..
खळ-रित रित मज बघूनि उमगलं कुंपण इथं शेत खाई...
कुंपण इथ शेत खाई..
भक्ताच्याच भाळी सारखीच माती तरी झेंडे येगळे, येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ति, सत्तेचीच प्रिती विठ्ठला..
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती...३

No comments: